top of page
Search

सुरंबी / शिरनी का होते ? जाणून घ्या ...

टीनिया व्हरसिकलर

ह्याला काही लोक "सुरंबी" असे पण म्हणतात . हा एक बुरशीचा संसर्ग आहे.व्हर्सिकॉलोर असे नाव आहे कारण ह्यामुळे परिणाम झालेल्या त्वचेचा रंग बदलतो आणि आजूबाजूच्या त्वचेपेक्षा एकतर उजळ

किंवा गडद बनतो.हे हाताचा वरचा भाग , छाती आणी पाठीवर छोटे गुलाबी , पिंगट किंवा तपकिरी पट्ट्या दिसू शकतात.

हे संसर्गजन्य नाही.अशा प्रकारची बुरशी सर्वसाधारणपणे आपल्या त्वचेवर असते, परंतु उन्हाळ्याच्या गरम महिन्यांमध्ये काही लोक बुरशीच्या वाढीला जास्त प्रवृत्त असतात. तसेच प्रतिकार शक्ती कमी असल्यास सुद्धा बुरशी वारंवार होऊ शकते.

टीनिया व्हरसिकलर लोकांमध्ये २० च्या जवळपास वयामध्ये जास्त आढळते . काही बाह्य घटक जे बुरशीला कारणीभूत असू शकतात ते आहेत - अंगाला तेल लावणे,वातावरणातील जास्त तापमान, जास्त आद्रता, आणि

जाड किंवा सिन्थेटिक कपड्यांमुळे घाम शोषून न घेतल्यामुळे.

अंतर्गत घटक जशे तेलकट त्वचा, जास्त घाम सुटणे , रोग प्रतिकार शक्ती कमी असणे, कुपोषण आणि आंतरिक स्टिरॉइड उपचार.

उपचार-

क्लोट्रिमॅझॉल आणि सेलेनियम सलफाईड कॉम्बिनेशन शाम्पूस हा सर्वात सुरक्षित आणि सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा उपचार आहे.

आधी धातूंचे दागिने काढा.

शाम्पू मानेपासून मांड्या आणि मनगटापर्यंत (लागण झालेल्या भागापलीकडे) लावा. १०-१२ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर शॉवर मध्ये धुवून काढा. ७ दिवस सतत असे करा. तुमच्या डॉक्टरांच्या शिफारसीनुसार उपचारांचे पालन करा .

अँटिफन्गल क्रीम्स हाही एक पर्याय आहे. रेझिस्टंट स्थितीसाठी इतर तोंडाने घ्यायची प्रेस्क्रिपशन औषधे उपलब्ध आहेत.

बुरशी संसर्ग एकदा नियंत्रणात आल्यावर डिस्कॉलॉरेशन निघून जाईल. त्वचेचा रंग सामान्य दिसण्यासाठी ३-६ महिने लागू शकतील.

शक्य तितकी ,त्वचा कोरडी ठेवा. संसर्ग ग्रस्त त्वचा दिवसातून २-३ वेळा स्वच्छ करा.

घाम आला कि लगेच पुसा. उपचार पूर्ण करने अत्यंत महत्वाचे आहे.

उन्हामध्ये बाहेर पाळणे टाळा, म्हणजे घाम येणार नाही.

घट्ट कपडे घालू नका. संसर्ग ग्रस्त भाग खाजवू नका.

सौन्दर्य प्रसाधने फार वापरू नका.


अजून माहिती साठी - https://youtu.be/F7MUFvl19r0



 
 
 

Recent Posts

See All
थंडी आली त्वचेला जपा!

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. परंतु शरीराचे...

 
 
 

Comentários


  • alt.text.label.YouTube
  • alt.text.label.Facebook
  • alt.text.label.Instagram

Skin Specialist Near Me

Created By Deep Ajay Ovhal, Enlightened Technologist pvt. ltd

©2022 by MARVEL SKIN, HAIR AND LASER CLINIC

bottom of page