top of page
Search

मधुमेह

शरीरातील विविध आजार त्वचेवरून कसे ओळखणार?

आपली त्वचा हि आपल्या शरीराचा आरसा आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही बदल घडतात , ते आपल्या त्वचेवर प्रतिबिंबित होतात . त्यामुळे आपल्या शरीरातील होणारे बदल उशीर होण्यापूर्वी आपण पूर्वीच त्वचेवर ओळखू शकतो . त्यापैकी काही सामान्यपणे आढळणाऱ्या आजारांची त्वचेवरील लक्षणे काय आहेत हे आपण बघणार आहोत.

१) डायबेटिस ( मधुमेह)

त्वचेवर जंतुसंसर्ग (४७.५)% - जसे पुरळ, फोड येणे,( बॅक्टरील इन्फेकशन) किंवा बुरशीचे (फंगल) इन्फेकशन जसे गजकर्ण , सुरंबी, येणे किंवा viral इन्फेकशन जसे viral warts आणि molluscum contagiosum इत्यादी.

२) Xerosis - म्हणजेच त्वचेवर कोरडेपणा येणे व खाजवणे (२६%)

३) Acanthosis nigricans - ( ७४%) ह्या कंडिशन मध्ये मानेवर व काखेत काळे , वेलवेट सारखे जाडसर चट्टे व सोबत चेहरा व काखेत काळेपणा दिसतो .

४) Achrochordons ( स्किन टॅग्स) म्हणजेच मानेवर , काखेत आणि चेहऱ्यावर चामखीळ येणे . ह्या कंडिशन मध्ये रुग्णांमध्ये सामान्यतः लठ्ठपणा ( स्थूलपणा) आढळून येते.

५) Diabetic dermopathy - हि एक मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सगळयात जास्त आढळणारी कंडिशन आहे.ह्यामध्ये छोटे , गोल, atrophic (खोल) असे चट्टे पायाच्या समोरच्या बाजूला गुडघ्याखाली दोन्हीबाजूला आढळतात.

६) Eruptive xanthomas - ह्यामध्ये गुडघ्यावर चरबी युक्त छोटे (पिनहेड ते द्राक्षाच्या आकाराचें) पिवळे- नारंगी -लालसर चट्टे आढळतात.

७) Rubeosis facei diabeticorum - म्हणजेच चेहऱ्यावरची त्वचा लाल होणे . हे डायबेटिस मध्ये रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या परिणामामुळे दिसते. परंतु जर वेळीच हे बदल लक्षात आले , तर मधुमेहामुळे डोळ्याच्या रक्तवहिन्यावर होणारे दुष्परिणाम जसे retinopathy , ज्यामध्ये अचानकपणे अंधत्व येऊ शकते , हे टाळता yeil.



 
 
 

Recent Posts

See All
थंडी आली त्वचेला जपा!

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. परंतु शरीराचे...

 
 
 

Comments


  • alt.text.label.YouTube
  • alt.text.label.Facebook
  • alt.text.label.Instagram

Skin Specialist Near Me

Created By Deep Ajay Ovhal, Enlightened Technologist pvt. ltd

©2022 by MARVEL SKIN, HAIR AND LASER CLINIC

bottom of page