केसांची निगा
- Marvel Skin, Hair and Laser Clinic
- Jun 14, 2022
- 2 min read
केसांची निगा:
काय करावे:
सगळ्यात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे कि शाम्पू,कंडिशनर आणि तेल हे सगळे ट्रीटमेंट चा एक भाग आहे ,किंवा केस चांगले ,चमकदार बनवण्या करिता मदत करतात. परंतु फक्त हे बाह्य घटक वापरून आपल्याला केसांची शक्ती आणि वाढ आणि नवीन सुदृढ केस येण्याची प्रक्रिया हि बदलता येत नाही, ह्याच्यासाठी आंतरिक घटक
च कामात येतात, जशे झाडांना खत पाणी लागत असते तशेच केसांच्या मुळांना सुद्धा काही खत पाणी ची आवश्यक्ता आहे.
ओले केस टॉवेलने जोरजोरात घासून पुसू नका. केस नैसर्गिक रीतीने वाळू द्या. व मऊ सुती
टॉवेलचाच वापर करा. तसेच ओल्या केसांना कधीच विंचरू नका . अशे केल्यास केसांना हानी होते कारण केस ओले असताना ते नाजूक असतात. केस वाळल्यावर मोठ्या दातांच्या कंगव्यानेच विंचरा. केस ज्या दिवशी धुतले आहेत त्या दिवशी विंचरताना रोज पेक्षा जास्त केस गळतात.
केस खूप ओढून घट्ट बांधू नका.
उनातं जातांना केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी हॅट किंवा स्कार्फ नि केसांना झाकून
घेतले पाहिजे.पोहण्याच्या तलावात उतरण्यापूर्वी केस ओले करा आणि क्लोरीनच्या पाण्यात पोहल्यानंतर नेहमी केस स्वच्छ धुवा.
आपले कंगवे आणि केसांचे ब्रश नियमित स्वच्छ करायला पाहिजे . आठवळ्यातून एकदा कोमट आणि साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा. केसांना आणि डोक्यावरील त्वचेला जोरजोराने मसाज करू नका.
जर केस जास्त गळत असतील तर हेअर ट्रेटमेंट्स जशे पर्मिंग, स्ट्रैटेनिंग , कलरिंग करू नका.
खूप जास्त उष्णतेचा वापर करणारे हेअर टूल्स जशे हेअर ड्रायर , स्ट्राईटनेर केसांना नुकसान करतात, ह्याचा वापर खूप जास्त करू नका.
केसांची खूप जास्त स्टईलिंग केल्यास सुद्धा केसांना हानी होते.
स्वतःच्या मनानी औषधउपचार करू नका.
केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरा. त्यामुळे शाम्पू लावल्यास केसांचा चिकटपणा आणि धूळ काढण्यास मदत होते. शाम्पू सगळीकळे सारख्या प्रमाणात लावा . शाम्पू च्या वापरानंतर केसांना कंडिशनर लावणे गरजेचे आहे. शाम्पू व कंडिशनर 'सल्फेट फ्री ' असणे गरजेचे आहे.
धूम्रपान व मद्यपान सोडा.
भरपूर पाणी प्या, कमीतकमी ८-१० ग्लासेस रोज .
आहारामध्ये प्रथिने, फळ, भाज्या , कळधान्ये जे व्हिटॅमिन्स अँड लोह नि भरलेल्या आहेत ते वाढवावे.
तणावरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.
पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम करा.
तुमच्या त्वचारोगतज्ञ यांना नियमितपणे भेट द्या.

Commentaires