मुरूम
- Marvel Skin, Hair and Laser Clinic
- Jun 14, 2022
- 2 min read
मुरूम
मुरूम हे ११ ते २५ ह्या वयात शरीरामधील रक्तामध्ये होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलामुळे येतात . म्हणूनच त्यांना तारुण्यपिटिका असं सुद्धा म्हणतात.चेहऱ्यावर ऑइल बनवणाऱ्या ग्रंथी जास्त असल्यामुळे हे चेहऱ्यावर जास्त येतात. तसेच छाती, पाठ आणि खांद्यावर सुद्धा मुरूम येऊ शकतात.ह्या ऑइल(सिबम) बनवणाऱ्या ग्रंथी हार्मोन्स( अँड्रोजन्स) च्या प्रभावा खाली जास्त सिबम बनवतात . त्यामुळे तिथे बॅक्टरीया (जंतू) चा संसर्ग होण्याचा धोखा वाढतो. आणि मुरूम किंवा पिंपल्स चिं सुरुवात होते. पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारांचे आणि आकाराचे असू शकतात.जसे व्हाईटहेड्स , ब्लॅकहेड्स, छोटे पिंपल्स आ
णि मोठ्या गाठी सुद्धा. ह्या मोठ्या गाठी नंतर चेहऱ्यावर व्रण किंवा खड्डे सुद्धा करतात. म्हणून पिंपल्स चे ट्रीटमेंट करणे आवश्यक असते.
मेटाबोलिक सिन्ड्रोम अश्या कंडिशन मध्ये वजन वाढूं शकते आणि हार्मोन्स चे बदल झाल्यामुळे पाळी सुद्धा अनियमित होते , सोबत केस विरळ होणे व डॅन्डरफ किंवा कोंडा पण होऊ शकतो. PCOD ह्या कंडिशन मध्ये पण पिंपल्स येतात. ह्यामध्ये लीन PCOD असल्यास वजन कमी असून सुद्धा हार्मोन्स चे बदल होऊ शकतात.
कधी कधी पंचविशी नंतर सुद्धा पिंपल्स येतात, त्याला अडल्ट एक्ने असे म्हणतात. ह्याचे कारण व्यायाम न करणे आणि आहार मध्ये पिष्टमय व गोडं पदार्थ जास्त घेतल्या
मुळे असू शकते.
आहारात भरपूर प्रमाणात हिरवा भाजीपाला व फळे असावीत. तळलेले , स्निग्ध व पिष्ठमय ,तसेच चॉकलेट्स,फास्टफूड्स, शीतपेय ह्याचा वापर कमी करावा.
पाणी भरपूर पिणे.
शांत झोप, आणि मानसिक ताण कमी केल्याने मुरूम येणे काही प्रमाणात टाळू शकतो.
नियमित व्यायाम हे गरजेचे आहे. सकाळी प्रदूषण विरहित मोकळ्या जागेत व्यायाम केले पाहिजे.
तैल घटक (ऑइल बेस) असलेले सौन्दर्य प्रसाधने टाळावेत .नेहमीच सौम्य व मिनरल बेस्ड सौंदर्य प्रसाधने वापरावीत. झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाकावा.
चेहरा दिवसातून २-३ वेळेस स्वच्छ धुवावा.पिंपल्स दाबू किंवा फोडू नये.
केसांतील कोंड्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने शाम्पू व
औषध घ्यावे.
याच सोबत केमिकल पीलिंग हे ह्या ट्रीटमेंट चा खूप महत्वाचा भाग आहे. ह्यात क्लिनिक मध्ये काही औषध चेहऱ्याला लावून चेहरा धुवून घेतात. ह्यामुळे त्वचेचे वरचे थर आणि डेड स्किन निघून जाऊन पिंपल्स आणि डाग निघून जातात. हि प्रक्रिया ४-५ वेळेस करावी लागते. तसेच व्रणासाठी CO2 लेसर आणि फ्रकॅशनल radiofrequency अशे लेसर च्या सह्यांनी (३-४ वेळा) चेहऱ्यावरील खड्डे कमी होऊन चेहरा सतेज होण्यास मदत होते.

Comments