top of page
Search

वांग होण्याची कारणं व उपाय

वांग म्हणजे काय?

वांग येणे हि एक त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावर काळे डाग होण्याची समस्या आहे. त्वचेवरील हे तपकिरी, काळ्या रंगाचे डाग ,ऊन पडणाऱ्या भागावर विशेषतः गाळ, नाक, कपाळ या भागावर येतात.

वांग कशामुळे होते?

वांग येण्यासाठी चेहऱ्याला ऊन लागणे हे सर्वात महत्वाचे कारण समजले जाते. वांगची सुरुवात बऱ्याचवेळा गरोदर पनात शरीरातील पदार्थाच्या बदलामुळे होते. त्यामुळे वांगला गरोदर पनाचा मुखवटा असे संबोधले जाते . वांग स्त्री व पुरुष दोघांना पण होऊ शकते .

चेहऱ्याला ऊन लागल्या नंतर त्वचेतील काळा रंग तयार करणाऱ्या पेशी जास्त प्रमाणात काळा रंग (मेलॅनिन) तयार करतात त्यामुळे वांग होते.

काही पदार्थाची allergy ,चेहऱ्यावरील केसांची वॅक्सिन्ग करणे, गर्भ निरोधक गोळ्या तसेच टेट्रासायक्लीन

,फेफऱ्यासाठीचे औषधे व मलेरियाची दिली जाणारी औषधे हि वांग होण्याची करणे असू शकतात.

वांगसाठी महत्वाचं उपचार म्हणजे ऊन्हापासून प्रतिबंध . उन्हापासून संरक्षण केल्यास वांग होण्यापासून संरक्षण मिळते. ऊन टाळणे व सनस्क्रीन चा नियमित वापर हे वांगच्या उपचाराचे गमक आहे.

ब्लिचिंग क्रीम - hydroquinone , ट्रेटिनॉइन इ. क्रीम वांगच्या उपचारासाठी वापरल्या जातात . या क्रीमचा नियमित दीड ते दोन महिन्यात वांग कमी होऊ शकते . काही जणांना या क्रीम चा फायदा होत नाही . हे क्रीम जास्त लावल्यामुळे त्वचा पातळ होणे, लाल होणे , खाजवणे, फोड येणे इ.समस्या येतात. म्हणून त्वचा रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हि क्रीम वापरू नये.

वांग दोन प्रकारची असते . एक त्वचेच्या वरील भागात असते व ती लवकर बरी होते व दुसरी त्वचेमध्ये खालच्या थरापर्यंत असते सर्व प्रकारच्या उपचारांना अवरोधक असते.

इतर उपचार : chemical पीलिंग, लेसर (५-६ वेळा)


अजून माहिती साठी - https://youtu.be/L3tITc7g5dI

# dark spots over face, # melasma, # blemishes # hyperpigmentation of face


 
 
 

Recent Posts

See All
थंडी आली त्वचेला जपा!

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. परंतु शरीराचे...

 
 
 

Comments


  • alt.text.label.YouTube
  • alt.text.label.Facebook
  • alt.text.label.Instagram

Skin Specialist Near Me

Created By Deep Ajay Ovhal, Enlightened Technologist pvt. ltd

©2022 by MARVEL SKIN, HAIR AND LASER CLINIC

bottom of page