पित्त खवालने व धाबडे येणे | करणे व उपाय
- Marvel Skin, Hair and Laser Clinic
- May 25, 2022
- 2 min read
गांधी /पित्त उठणे/खवळणे (urticaria )
ह्या प्रकारामध्ये त्वचेवर खाज येणे,लालसर उंचवटे धाबळे , सूज येणे, ताप येणे, पोट दुखणे
इत्यादी लक्षणे दिसून येतात .
हि एक शरीराची जास्तीची प्रतिक्रिया आहे. साधारणतः
बाह्य जंतू किंवा नवीन पदार्थ त्वचेमध्ये /शरीरामध्ये प्रवेश करतात , तेव्हा शरीर अश्या प्रकारची प्रतिक्रिया देत असते . काही कारणांमुळे शरीराच्या प्रतिकार शक्तीमध्ये बदल घडल्यामुळे असे परिणाम दिसतात.
कारणे-
१) आहार (१०%) - खाद्यपदार्थातुन होणारी एलर्जी हि फक्त १०% टक्के रुग्णांमध्ये कारणीभूत असते . त्यामुळे शेंगदाणे , मांसाहारी पदार्थ , तूरडाळ, टोमॅटो, दुग्धजन्य पदार्थ , कृत्रिम रंग मिश्रित व साठविलेले खाद्य पदार्थ इत्यादी पासून होण्याची शक्यता असते.
2) जंतुसंसर्ग (10%)- घशाचे जंतुसंसर्ग , किडलेले दात, लघवीमार्ग जननइंद्रियांचे जंतुसंसर्ग , पोटातील कृमी ,विषाणूंद्वारे संसर्ग इत्यादी करणे असू शकतात.
3)औषधी(१०%) -रक्तदाब आटोक्यात आणणारे , वेदनाशामक , काही आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधी हा आजार उत्पन्न करतात किंवा वाढवू शकतात.
4) काही जणांना लहानपणीपासून ऍलर्जी होण्याची प्रवृत्ती असते , किंवा आधीच्या पिढ्यांमध्ये दमा , नेहमी सर्दी , शिंका येणे अश्या प्रवृत्ती असतील तर त्यांना हे आजार होण्याची शक्यता वाढते.
5) भौतिक कारणांद्वारे होणारा (20%) - ह्यामध्ये थंडी , उष्णता , कंपण , दाब पडणे , ऊन , व्यायाम इत्यादी वेगवेगळ्या कारणांमुळे आजार उत्पन्न होऊ शकतो .
6)स्वयंप्रतिकारशक्ती मधील होणाऱ्या बदलामुळे उत्पन्न होणारे आजारामुळे होणारे (5%) उदा. थायरॉईडचे आजार , सांधेवात , S L E, इत्यादी
7) कोणतेही कारण न आढळता होणारा (CHRONIC SPONTANEOUS URTICARIA)
ह्यात कोणतेही दृश्य कारण सापडत नाही व परत परत हा त्रास उदभवतो .
आपण कशाप्रकारे ह्याच्यावर मात करू शकतो ?
प्रथमतः डॉक्टर ह्याचे प्रकार शोधून काढतील . त्यासाठी काही टेस्टची आवशक्यता लागू शकते . बऱ्याच वेळा कारणे सापळत नाहीत. अश्यावेळी रक्तदाब मधुमेह या आजारांच्या उपचारामध्ये जसे नियमित औषधोउपचार करावा लागतो त्याप्रमाणे ह्यासाठीही नियमित उपचार करावे लागतात . शरीरातील प्रतीकारशक्तीची प्रतिक्रिया आटोक्यात आणण्यासाठी औषधींची मात्रा निवडणे महत्वाचे असते. रुग्णांनी औषधे वेळेवर घेतली तर ह्या आजारावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवता येते.
हा आजार कमी करण्यासाठी औषधाप्रमाणेंच योग्य दिनचर्या व आहार ह्या द्वारे मात करता येऊ शकते.
त्याच प्रमाणे ताणतणावामध्ये न राहता तणावमुक्ती साठी ध्यान करणे , श्वसनाचे व्यायाम करणे हे उपयुक्त ठरते. आहारामध्ये ताजे पदार्थ जेवढे नैसर्गिक रित्या वापरता येतील तेवढे चांगले.
दररोज चालणे आवश्यक आहे . दररोज 30-45 मिनिटे (4-5किलोमीटर) चालणे आवश्यक आहे.
वरील नमूद अनेक कारणांमधून आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टी ओळखून त्या टाळण्याचा प्रयत्न करावा .
सर्वात महत्वाचे म्हणजे अशा रुग्णांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.
अजून माहिती साठी -

Comments