top of page
Search

तुम्हाला पूर्ण शरीरावर रात्री खूप खाज आहे का? खरूज तर झाले नाही ?

खरूज

खरूज हे " सारकॉप्ट्स स्केबी" ह्या जंतू संसर्गाने होणारा आजार आहे. हा संसर्गजन्य आजार एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीला त्वचा किंवा कपड्यांच्या संपर्क यामुळे पसरतो. त्यामुळे कमी जगेल जास्त लोक राहत असणाऱ्या ठिकाणांमध्ये आजार जास्त प्रमाणात आढळतो.

या आजार मध्ये खूप खाज व पुरळ येते. ही पुरळ पोटाच्या बाजूला, बोटांच्या मध्ये, अवघड जागी ,काखेत व मांडीवर जास्त असते. या आजारात अवघड जागी गाठी पण येऊ शकतात तसेच खाज रात्री जास्त प्रमाणात असू शकते.

या आजाराचा उपचार सोपा असून रुग्णासोबत त्याच्या सोबत राहणाऱ्या घरातील सगळ्या लोकांनी एकाच दिवशी उपचार करणे आवश्यक आहे .तसेच डॉक्टरांनी दिलेली क्रीम माने वरून खाली संपूर्ण अंगाला लावणे व ८ ते १० तासानंतर दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने अंघोळ करावी. अंघोळ करताना स्क्रबर वापरले तर उत्तम. त्याच बरोबर मागील आठ दिवसात वापरलेले सर्व कपडे गरम पाण्यात ३०मिनिट भिजविणे व धुवून उन्हात वाळू घालणे. त्याच्या सोबत वापरात असलेले अंथरून, पांघरून,टॉवेल हे सगळं सुद्धा धुवून उन्हात वाळू घालणे.

घरातील इतरांना त्रास नसला तरी एकाच दिवशी सर्वानी उपचार घ्यावेत, त्यामुळे परत एकमेकांपासून संसर्ग होण्याची शक्यता टळते.

दररोज अंघोळ करणे , स्वच्छ टॉवेल आणि कपडे वापरणे, दुसऱ्यांचे कपडे न वापरणे ही काळजी महत्वाची आहे.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या पेशंटमध्ये हे आजार जास्त तीव्र होऊ शकते व ट्रीटमेंट जास्त दिवस घेण्याची गरज पडू शकते. औषधोपचारानंतर रुग्णाची खाज पूर्णपणे कमी होण्यास २-३ आठवडे लागू शकतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पूर्ण उपचार करून घ्यावेत.


अजून माहिती साठी - https://youtu.be/1iC0PG-cKIY


# scabies,# night itching,# itching over whole body,hostel students itching,# itching with rash,# itching in family



 
 
 

Recent Posts

See All
थंडी आली त्वचेला जपा!

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. परंतु शरीराचे...

 
 
 

Comments


  • alt.text.label.YouTube
  • alt.text.label.Facebook
  • alt.text.label.Instagram

Skin Specialist Near Me

Created By Deep Ajay Ovhal, Enlightened Technologist pvt. ltd

©2022 by MARVEL SKIN, HAIR AND LASER CLINIC

bottom of page